आदिवासी बहुल भागांतील लसीकरणासाठी अजूनही कसरत

आदिवासी बहुल भागांतील लसीकरणासाठी अजूनही कसरत
आदिवासी बहुल भागांतील लसीकरणासाठी अजूनही कसरत
Corona vaccination

धुळे : शिरपूर तालुक्यामध्ये आरोग्य विभागाला लसीकरण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदिवासी परिसर असल्‍याने नेटवर्कची समस्‍या असल्‍याने आरोग्‍य विभागाला लसीकरण मोहिम फत्‍ते करण्यासाठी अजूनही कसरत करावी लागत आहे. (dhule-shirpur-news-aadivashi-aria-corona-vaccination-problem-network-issue)

राज्य सरकारतर्फे कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. एकीकडे सर्व सुविधा उपलब्ध असताना देखील लसीकरण दरम्यान रिकामी इंजेक्शन टोचून लसीकरणाचा अनागोंदी कारभार समोर आल्याचे देखील बघितले आहे. दुसरीकडे मात्र अतिदुर्गम भागात लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी चांगली धडपड करावी लागत आहे. आरोग्य विभागाला लसीकरणा दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी नेटवर्क मिळत नसल्यामुळे थेट पहाडावरच लसीकरण कॅम्प भरवावा लागत आहे.

ऑनलाईन रजिस्‍ट्रेशनला समस्‍या

लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. परंतु शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्ये नेटवर्कच नसल्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे तरी कसे? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर पडला आहे. परंतु आरोग्य विभागाने अडचणीवर मात करीत लसीकरण मोहीम न थांबवता सुरू ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निवडत लसीकरण मोहीम यशस्वी करताना दिसत आहेत.

Corona vaccination
इंजिनिअरींग करणारी भावंडे- शेतात अभ्यास करुन करताहेत आई वडिलांनाही मदत

उंच टेकडीवर कॅम्‍प

उंच टेकडीच्या भागामध्ये नेटवर्क मिळत असल्यामुळे डोंगराळ भागांमध्ये आदिवासी बांधवांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे थेट टेकड्यांवरच लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे उंच टेकडीच्या ठिकाणी लसीकरणाचे रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे. तर काही गावांमध्ये अक्षरशः नेटवर्क मिळावे यासाठी आरोग्य विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांना थेट पाण्याच्या टाकीवर चढून डोंगल हातात पकडून नेटवर्क शोधावा लागत आहे. असे असले तरी आदिवासी अतिदुर्गम भागातील कुठलाही नागरिक लसीकरनापासून वंचित राहणार नाही याची पूर्णपणे काळजी आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे.

आदिवासी केव्‍हा येणार नेटवर्कमध्‍ये

इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ येत असताना आदिवासी पाड्यांवर नेटवर्कच मिळत नसल्यामुळे अतिदुर्गम भागातील आदिवासी मात्र अजूनही जगापासून दूरच राहिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने मोफतचे टॅब वाटण्यापेक्षा आदिवासी बांधवांकडे असलेल्या छोट्या- मोठ्या मोबाईलला नेटवर्क उपलब्ध करून दिले; तरी या आदिवासी बांधवांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात इतरांप्रमाणे आपला विकास करणे शक्य होणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com