‘ती’च्या निर्धारापुढे नियतीही झुकली; अखेर दोघे विवाहबद्ध

‘ती’च्या निर्धारापुढे नियतीही झुकली; अखेर दोघे विवाहबद्ध
Marriage
MarriageSaam tv

शिरपूर (धुळे) : विवाह निश्चित झाला, तारीखही ठरली. नियतीने मात्र खेळ केला. नियोजित वराला भीषण अपघात झाला. अपंगत्वाच्या सीमेवर तो जाऊन पोचला. संसार कसा करशील, त्याचा नाद सोड, असा सल्ला भावी वधूला देण्यात आला. पण तिने मनाने त्याला वरले होते. ती वाट पाहत राहिली, प्रार्थना करीत राहिली. तिच्या (Dhule News) निर्धारासमोर नियतीलाही माघार घ्यावी लागली. नियोजित तारखेच्या सहा महिन्यांनी त्यांची लग्नगाठ बांधली गेली. (dhule shirpur news After waiting for her for six months they got married)

Marriage
तब्बल तेरा वेळा सर्पदंश; एकाच वर्षात १० वेळा सर्पाशी सामना, कुटुंबीय चिंतेत

बभळाज (ता. शिरपूर) येथील भावना आणि अंचळगाव (जि. भडगाव) येथील नितीन २१ मेस विवाहबद्ध झाले. एकत्र आल्याचा आनंद आणि गेल्या सहा महिन्यांत सोसलेल्या शारीरिक व मानसिक यातनांच्या आठवणींनी दोघांचे डोळे पाणावले. दोघेही उच्चशिक्षित आहेत. गेल्या वर्षी त्यांचे लग्न ठरले. २४ डिसेंबर तारीखही निश्चित झाली. उभय पक्षांनी जय्यत तयारी केली. पत्रिका वाटल्या गेल्या. अंकलेश्वर (गुजरात) येथे नोकरीला असलेला नितीन मोरे १७ डिसेंबरला गावी जाण्यासाठी निघाला. रेल्वेत चढताना हात निसटून तो खाली पडला. जीव बचावला, मात्र मांडीला जीवघेणी जखम झाली. मोठी शस्त्रक्रिया करणे भाग पडले. मात्र, पुढील भवितव्य अंधारात सापडले.

संबंध तोडण्याचा सल्‍ला

दोन्ही पक्षांच्या आनंदावर पाणी पडले. भावनाच्या नातलगांपैकी काहींनी अपंग माणसाशी संसार कसा करशील, लग्न झालेले नाही. हा संबंध मोडून टाक, असा सल्ला दिला, पण तिच्यासह वडील सुनील वाघ, काका पत्रकार दीपक वाघ यांनी त्यास नकार दिला. लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, लग्नानंतर असा अपघात (Accident) झाला असता, तर आपण तसाच निर्णय घेऊ शकलो असतो का, असा प्रतिप्रश्न करून त्यांनी सल्ला देणाऱ्यांना निरुत्तर केले. दरम्यान, अपंगत्वाच्या उंबरठ्यावर असलेला नितीन अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवीत होता. अखेर शस्त्रक्रियेचा पर्याय निवडण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

तीची प्रार्थना अन्‌ मिळाले बळ

नितीन बरा व्हावा, यासाठी भावना सातत्याने प्रार्थना करीत होती. तिची तळमळ पाहून नितीनलाही बळ चढले. शस्त्रक्रियेनंतर प्रचंड वेदना सहन करूनही तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर त्याने चालण्यासाठीही खूप परिश्रम घेतले. अखेर स्वत:च्या पायावर चालण्याचा आत्मविश्वास प्राप्त होताच त्याने वाघ कुटुंबीयांना संदेश दिला. पुन्हा एकवार लगीनघाई सुरू झाली. २१ मेस अंचळगाव येथे नितीन व भावना थाटामाटात विवाहबद्ध झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com