Bribe Trap: गुलाब रुतला लाचेच्या काट्यात; जन्‍माच्‍या नोंदीसाठी ग्रामसेवक अडकला

गुलाब रुतला लाचेच्या काट्यात; जन्‍माच्‍या नोंदीसाठी ग्रामसेवक अडकला
Bribe Trap
Bribe TrapSaam tv

शिरपूर (धुळे) : ग्रामपंचायतीच्या दप्तरात जन्माची नोंद करण्यासाठी एक हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना जामन्यापाडा (ता.शिरपूर) येथील ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Dhule ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ५ मे दुपारी जामन्यापाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ही कारवाई झाली. लाचलुचपत (Bribe) प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर चौधरी याला ताब्यात घेताना त्याने प्रतिकार केला. त्यामुळे बलप्रयोग करून त्याला अटक करणे भाग पडले. (Live marathi News)

Bribe Trap
Sangamner News : संगमनेरला हिंदु जन आक्राेश माेर्चा; 'समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही समर्थ' (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणातील तक्रारदार (Shirpur) जामन्यापाडा गावातील रहिवासी आहे. त्याच्या आत्याचा जन्म १९६८ मध्ये झाला असून तिचे वडील अशिक्षित असल्यामुळे त्यावेळी जन्माची नोंद केली नव्हती. जन्माची नोंद करून मिळावी, यासाठी तक्रारदाराने येथील न्यायालयात अर्ज दिला होता. २०२२ मध्ये न्यायालयाने महिलेच्या जन्माची दप्तरी नोंद करण्यासाठी आदेश जारी केले. आदेशाची प्रत जोडून १६ मेस तक्रारदाराने अर्ज दिला. त्यावर ग्रामसेवक चौधरी याने लेट फी म्हणून एक हजार ४०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. हा सरळ लाच मागण्याचा प्रकार असल्याचे दिसून आल्याने तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.

Bribe Trap
Shivrajyabhishek Din : तोपर्यंत मी गडउतार होणार नाही : युवराज संभाजीराजे छत्रपती (पाहा व्हिडिओ)

तक्रारीची पडताळणी करून पथकाने सोमवारी (५ मे) दुपारी जामन्यापाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून एक हजार ४०० रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने गुलाब चौधरीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पथकाच्या तावडीतून सुटण्यासाठी जोर लावला. त्यामुळे बलप्रयोग करून त्याला अटक करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com