विज कोसळून कुटुंब निराधार; चारही कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्‍याचे रेशन

विज कोसळून कुटुंब निराधार; चारही कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्‍याचे रेशन
विज कोसळून कुटुंब निराधार; चारही कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्‍याचे रेशन

धुळे : शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे काही दिवसांपूर्वी विज कोसळून चार कुटुंबाचे नुकसान झाले होते. यात मयत झालेल्या दोन कुटुंबांना व कायम अपंगत्‍व आलेल्या दोन अशा एकूण चार कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्याचे रेशन किराणा वाटप करण्यात आले आहे. (dhule-shirpur-news-Powerless-family-Ration-of-two-months-to-all-four-families-by-Patel-family)

माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यावतीने नुकसानग्रस्तांना तसेच आपतग्रस्तांना नेहमीच तातडीने मदत करण्यात येते. शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते नुकसानग्रस्त चार कुटुंबांना दोन महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले. या चारही कुटुंबांची भेट घेऊन आमदार काशिराम पावरा यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

विज कोसळून कुटुंब निराधार; चारही कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्‍याचे रेशन
तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

१० जुलै काळ बनून आला

कुरखळी येथे १० जुलैला चार जणांवर वीज कोसळली. त्यात दोन जण जागीच ठार झाले; तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. कुरखळी गावालगत शेतात विज पडून मनोज सुकलाल कोळी (वय ३०), सुनील सुदाम भिल (वय ३२) दोन्ही रा. कुरखळी (ता. शिरपूर) हे जागीच मयत झाले होते. तर समाधान बारकू भिल (वय ३०) व रवींद्र गुलाब भिल (वय २८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. या चारही कुटुंबांना दोन महिन्याचे रेशन संपूर्ण किराणा देण्यात आला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com