Dhule Political News: सुप्रीम कोर्टाचा निकाल आला अन् भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; धुळ्यात एकच जल्लोष

Dhule News: धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीविरोधातील सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल समोर आला आहे.
Dhule Political News
Dhule Political NewsSaam TV

Dhule Political News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. शिंदे सरकारचं सुप्रीम कोर्टात काय होणार? याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीविरोधातील सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल समोर आला आहे. (Latest Marathi News)

Dhule Political News
Devendra Fadnavis News: कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार; फडणवीस छातीठोकपणे म्हणाले, 'गरीबांसाठी दिल्लीतून...'

धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीविरोधात विरोधकांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल आपल्या बाजूने लागण्यानंतर सत्ताधारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. (Breaking Marathi News)

धुळे (Dhule) जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी न्यायालयातर्फे सर्वसाधारण महिला राखीव घोषित करण्यात आले होते. यानुसार निवडणुका झाल्यानंतर अश्विनी पवार यांनी भाजपतर्फे जिल्हा परिषद अध्यक्षसाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. त्यानंतर त्यांची निवड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी करण्यात आली.

Dhule Political News
PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानच्या १४ व्या हप्त्याची तारीख ठरली

दरम्यान, विरोधकांतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वसाधारण महिला या राखीव पदाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर न्यायालयातर्फे सुनावणी संपन्न झाली असून न्यायालयाने यापूर्वी आरक्षित केलेल्या सर्वसाधारण महिला या गटासाठीच पुढे देखील आरक्षण जाहीर केले.

न्यायालयाच्या या निकालामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर असलेल्या अश्विनी पवार यांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर धुळे जिल्हा परिषद कार्यालय बाहेर फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे देखील भरवले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com