Satara Breaking News : उद्याेजकानं लॉकअपमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न; उपचारासाठी पुण्याला हलवलं

त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले.
digambar agawane, satara breaking news
digambar agawane, satara breaking newssaam tv

Digambar Agawane : फलटण येथील आयुर उदयोग समूहाचे संस्थापक दिगंबर आगवणे यांनी लोणंद पोलिस (police) ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर आगवणे यांना रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आलं आहे.

दिगंबर आगवणे आणि माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गेले काही महिने जुन्या व्यवहारातून वाद सुरू होते. यामधून दोघांनी एकमेकांवर गुन्हे देखील नोंद केले आहेत.

दरम्यान आगवणे यांच्या आत्महत्या प्रयत्नानंतर त्यांना लोणंद येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. या घटनेनंतर आगवणे यांच्या मुलाने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि पोलिस प्रशासन या घटनेला दोषी असल्याचे संदेश समाज माध्यमातून व्हायरल केले.

Edited By : Siddharth Latkar

digambar agawane, satara breaking news
Satara : छोट्या छोट्या उद्योगांना सातारा जिल्ह्यातील बँकांनी कर्ज पुरवठा करावा : सोम प्रकाश

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com