दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली; रस्ता वाहतुकीस बंद

डोंगराचा काही भाग कोसळून माती, दगड रस्त्यावर पसरली आहे.
दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली; रस्ता वाहतुकीस बंद
दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली; रस्ता वाहतुकीस बंदराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्ह्यात पावसाने पहाटे विश्राती घेतली होती. सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा पावसाने Rain बॅटींग करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण भागात पावसाचा जोर आहे. दिघी Dighi माणगाव Mangaon या रस्त्यावर सकाळी दरड कोसळली असून हा रस्ता वाहतुकीस बंद Road closed करण्यात आला आहे. रस्त्यावरील मौजे कुडगाव गावाजवळ डोंगराचा काही भाग कोसळून माती, दगड रस्त्यावर पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे देखील पहा -

जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली असल्याने रोहा, माणगावमध्येही अनेक भागात पाणी साचले आहे. काळ नदीही तुंबडी भरून वाहू लागल्या आहेत. माणगाव शहरात रस्त्यावर पाणी साचले आहे. रायगड दक्षिण भागात पावसाचा जोर जास्त असल्याचे दिसत आहे. आज पावसाचा रेड अलर्ट दिला असल्याने जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com