मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवासस्थानाची दुरवस्था; लाखोंचे साहित्य चोरी

या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

बुलडाणा - ग्रामीण भागातील सर्व सुवव्यवस्था पाहण्याचे काम मिनी मंत्रालंय नावाने ओळखली जाणारी जिल्हा परिषद करित असते, त्या मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या बुलडाणा (Buldhana) शहराच्या मध्यभागी असलेले निवासस्थानाची व शासकीय गोदामाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे दुरवस्था झाली असून दोन्ही निवासस्थानातून व बाजूला असलेले गोदामातून लाखोंचे साहित्य चोरून नेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ज्यामध्ये निवासस्थानामध्ये लावण्यात आलेले एसी, वायरिंग, कार्पेट, सगळे प्रकारचे फर्निचर, लोखंडी टिनपत्रे, लोखंडी मोठे गेट, सागवानचे लाकडी दरवाजे, सागवानची लाकडी व गोदामात ठेवण्यात आलेले शेती उपयोगी शासकीय लोखंडी साहित्य ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. ते चोरून नेले आहे.

हे देखील पाहा -

शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून नागरिक ह्या जागेचा लघुशंकेसाठी व शौचालय साठी वापर करीत असल्याने याठिकाणी मोठी दुर्गंधी पसरलेली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीच पोलीस कारवाई करण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे .

यामुळे जाणून-बुजून हा प्रकार करण्यात आला तर नाही ना? असा संशय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व्यक्त केला जात आहे. म्हणून या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी या गंबीर बाबीकडे लक्ष देणार का? व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Buldhana News
Buldhana: एमआयएमच्या वतीने रस्त्याच्या खड्यात झाडे लावून निषेध आंदोलन...

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवासस्थानाच्या देखरेख करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून रवींद्रसिंग परदेशी यांच्याकडे प्रभारी पदभार होता, ते काल सेवानिवृत्त झाले .. आता सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवासस्थानाच्या देखरेख करण्याची जबाबदारी वाऱ्यावर दिसून आली आहे.

बुलडाणा शहराच्या मध्यभागी असलेले अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवासस्थानाची व शासकीय गोदामाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे दुरवस्था झाली असून दोन्ही निवासस्थानातून व बाजूला असलेले गोदामातून लाखोंचे साहित्य चोरून नेले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com