'इनोव्हेशन इन एज्युकेशन' योजनेचे ब्रॅंड अँम्बेसेडर म्हणून डिसले गुरुजींची निवड

शिक्षण क्षेत्रात डिसले गुरुजींनी हाती घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांमूळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण अधिक सुलभ होत आहे.
'इनोव्हेशन इन एज्युकेशन' योजनेचे ब्रॅंड अँम्बेसेडर म्हणून डिसले गुरुजींची निवड
रणजितसिंह डिसले गुरुजीविष्णूभूषण लिमये

विष्णूभूषण लिमये

सोलापूर: महाराष्ट्र राज्य शासनाच्या (Maharashtra Government) कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रसार व प्रचार करिता सदिच्छा दूत म्हणून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची निवड करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात डिसले गुरुजींनी हाती घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांमूळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण अधिक सुलभ होत आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी हाती घेतलेले उपक्रम नव उद्योजकांना प्रेरणादायी करणारे ठरतील, म्हणूनच हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत या हेतूने शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यताचे सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे.

सदिच्छादूत म्हणून आता डिसले गुरुजी इनोव्हेशन सोसायटीचा विकास होण्यासाठी तळागाळातील विद्यार्थी, नव उद्योजक, प्राध्यापक, स्टार्टअप यांच्यापर्यंत योजनांचा प्रसार आणि प्रचार करतील. राज्य शासनाच्या स्टार्टअप धोरण 2018 च्या प्रभावी अंमलबजावणी करिता महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विवीध योजना,उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com