
सुशील थोरात
Ahmednagar BJP News: भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या शुभारंभ आज अहमदनगर शहरात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरत सिंह रावत आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष विनोद गोटिया यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह नगर जिल्ह्यातील दक्षिण भगाचे भाजपचे सर्व आमदार पदाधिाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र विधानपरषदेतील आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती.
गेल्या काही दिवसांपासून आमदार राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यात दरी वाढत आहे. आमदार राम शिंदे यांनी दक्षिण जिल्ह्यातून खासदारकी लढवण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हापासून सुरू झालेली दरी वाढत आहे. (Latest News Update)
जामखेड कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मदत केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. त्यावेळी सुजय विखे यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली होती. या दोघांमधील अंतर वाढत चालले होते.
आज महाजनसंपर्क अभियानाला केंद्रीय पथक आले असतानाही आमदार राम शिंदे यांची कार्यक्रमाला दांडी मारणे हा चर्चेचा विषय झाला आहे. राम शिंदे हे मागील फडवणीस सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच त्यांच्याकडे सात विभगाच्या मंत्रिपदाचा कारभार होता. मात्र त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने कार्यक्रमाला दांडी मारणे यावरून भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.