महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; कुलगुरू कार्यालयावर दगडफेक

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर काल रविवारी पहाटेच्या सुमारास दगडफेकीचीघटना घडली आहे.
Mahatma Phule Agricultural University News
Mahatma Phule Agricultural University NewsSaam TV

मोबीन खान -

अहमदनगर : राहुरीच्या (Rahuri) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर काल रविवारी पहाटे ३ च्या सुमारास विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढुस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. (Mahatma Phule Agricultural University) विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झालेने एकच खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार, कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेसाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन (Online) विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

पाहा व्हिडीओ -

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ७० हजार रुपये फी भरावी लागते, विद्यापीठात १६८ प्रवेश मर्यादा आहे. विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये ५०० विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करत असून त्यांना हॉस्टेल किंवा मेस फी नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली. अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेलपासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला.

या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत ५०० विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला, तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Mahatma Phule Agricultural University News
'...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मराठा समाजाला आश्वासन

विद्यापीठात घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे. विद्यार्थ्यांमधले वाद मिटवले. परीक्षांच्या काळात काही बाहेरचे विद्यार्थी येथे अभ्यासाला येतात. विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत वाद होते. आता ते वाद मिटविले गेले आहेत.असे राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलमंत्री महानंद माने, यांनी म्हटले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com