डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मराठी माणसाला मारहाण!

डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मराठी माणसाला मारहाण!
डोंबिवलीत भाजी विक्रेत्यांमध्ये राडा...प्रदीप भणगे

डोंबिवली - पुन्हा एकदा डोंबिवलीत फेरीवाल्यानंमध्ये राडा झाला आहे.काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर परप्रांतीय फेरीवल्याकडून प्राणघातक हल्ला झाल्यानं परप्रांतीयांच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोकेवर काढले असताना डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात परशुराम मल्याली, जयेश मल्याली, विष्णू मल्याली, सुभाष मल्याली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हे चारही जण फरार आहेत.

हे देखील पहा -

डोंबिवली मधील छेडा रोडवरील भाजी मार्केट परिसरात गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास कमलाकर पाटील आणि पत्नी भाजी विक्रीस बसले होते.त्यांच्या बाजूलाच परशुराम, सुभाष, जयेश व विष्णू हेही भाजी विक्रीस बसले होते.दरम्यान कमलाकर यांच्या पत्नीने ओरडून भाजी विकू ना असे त्या चौघांना सांगितले त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारी झाला.चौघांनी कमलाकर याना ठोश्या बुक्याने तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. यामध्ये कमलाकर यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. डोंबिवलीत यापूर्वीही फेरीवाल्यांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यात फेरीवाल्याने सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर कल्याण डोंबिवलीतही त्याची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

डोंबिवलीत भाजी विक्रेत्यांमध्ये राडा...
ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम तेजीत

डोंबिवली स्टेशन बाहेर फेरीवाल्याचे साम्राज्य...

डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेर फेरीवाल्याचे साम्राज्य झाले आहे.चिमणी गल्ली,रात रोड याठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात.स्टेशन पासून 150 मीटर आता फेरीवाल्याना बंदी असताना फेरीवाले बसत आहेत, मात्र याकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात. येथेही अनेक वेळेला राडा झाला आहे.तर महिलांना छेडण्याचे प्रकार घडला आहे.त्यामुळे महापालिका आयुक्त लक्ष देतील का हे पाहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com