पंढरपूरात केवळ एक रूपयात गणेश मूर्तींचे वाटप
पंढरपूरात केवळ एक रूपयात गणेश मूर्तींचे वाटपभारत नागणे

पंढरपूरात केवळ एक रूपयात गणेश मूर्तींचे वाटप

पंढरपूरात केवळ एक रूपयात गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. पंढरपूरातील सोन्या मारुती गणेश मंडळाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे.

पंढरपुरात केवळ एक रूपयात गणेश भक्तांना गणेश मूर्तीचे आज वाटप करण्यात आले. पंढरपूरातील नगरसेवक लखन चौगुले आणि सोन्या मारुती गणेश मंडळाच्या वतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

हे देखील पहा -

या उपक्रमाअंतर्गत सुमारे पाचशेहून अधिक‌ गणेश‌ भक्तांना आकर्षक गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले. यंदाच्या गणेश उत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. गणेश भक्तांनी गणेशोत्सव साध्या आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन केले आहे.

पंढरपूरात केवळ एक रूपयात गणेश मूर्तींचे वाटप
IPL 2021: ''भारतीय संघातील 1 कोरोना पॉझिटिव्ह केस IPL धोक्यात आणेल''

प्रशासनाच्या या‌ आवहनाला प्रतिसाद देत सोन्या मारुती मंडळाने पंढरपूर शहरातील गणेश भक्तांना कोरोनाचे सर्व नियम पाळून ‌पर्यावरण पुरक पाचशेहून अधिक एक ते दीड‌ फूट उंचीच्या गणेश मूर्ती भेट देण्यात आल्या. सोन्या मारुती मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे गणेश भक्तांनी स्वागत केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com