'कृपाछत्र' उपक्रमांतर्गत गरजूंना छत्र्यांचे वाटप- दिलीप ठाकूर

विशेष निमंत्रक म्हणून वैद्यकीय महाविद्यालय औषध विभागाचे प्रमुख डॉ. भुरके यांची उपस्थिती होती. पावसाळा लक्षात घेऊन त्यापासून रुग्णांना आपला बचाव करुन प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी या छत्र्या उपयोगी पडतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
'कृपाछत्र'  उपक्रमांतर्गत गरजूंना छत्र्यांचे वाटप- दिलीप ठाकूर
दिलीप ठाकूरकडून छत्र्या वाटप

नांदेड : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एआरटी विभागात दुर्धर आजारासह जगण्याचा सामना करणाऱ्या रुग्णांना लॉयन्स क्लब सेंट्रल व भाजप महानगर यांच्यामार्फत धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी सुरु केलेल्या कृपाछत्र या उपक्रमांतर्गत गरजूंना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विशेष निमंत्रक म्हणून वैद्यकीय महाविद्यालय औषध विभागाचे प्रमुख डॉ. भुरके यांची उपस्थिती होती. पावसाळा लक्षात घेऊन त्यापासून रुग्णांना आपला बचाव करुन प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी या छत्र्या उपयोगी पडतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कृपाछत्र हा उपक्रम समाज उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की २०२१ छत्र्या वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून आणखी साडेअकराशे छत्र्या वाटप करण्यासाठी दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - Good News : आर्यन देशमुख चिकाळेकर भारतीय युद्ध नौकेत लेफ्टनंटपदी

या उपक्रमासाठी हरीभाई मेहता, निळू पाटील, रंगनाथ विष्णुपुरीकर, स्नेहलता जायस्वाल यांनी छत्र्या दिल्या आहेत. छत्र्या वितरण करण्यासाठी सुरेश शर्मा, डॉ. स्वाती जीवने, डॉ. ज्योती कुलकर्णी व सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विहान प्रकल्प समन्वयक कल्पना कोकरे, दिनेश ठाकूर, संतोष शिंदे, आकाश पोले, पल्लवी हनुमंते यांनी परिश्रम घेतले. कृपाछत्र उपक्रमाची भूमिका व आभार विहान प्रकल्प संचालक ऋषिकेश कोंडेकर यांनी केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com