जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक
जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतकअरुण जोशी

जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांसाठी अर्जांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या District Bank संचालकांसाठी Director अर्जांचे applications अर्धशतक पूर्ण झाले आहे. गुरुवारी ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांतील अर्जांची एकूण संख्या ५० वर पोहोचली आहे. ६ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने ३ आणि ४ सप्टेंबर व ६ सप्टेंबर असे तीन दिवस शिल्लक आहेत.

हे देखील पहा-

५ सप्टेंबरचा रविवार असल्याने त्यादिवशी नामांकनाची प्रक्रिया बंद राहणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्टपासून नामांकनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ सप्टेंबरला ८ तर २ सप्टेंबरला ४२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत, असे निवडणूक यंत्रणेतील सहाय्यकारी अधिकारी तथा सहायक निबंधक पारिसे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान १ सप्टेंबरला माजी आमदार MLA नरेशचंद्र ठाकरे, राकाँचे अरुण पाटील गावंडे, अभय गावंडे, मनीष कोरपे आणि अनिल जळमकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक
जिल्‍हा बँक निवडणूक हालचाली.. जळगाव जिल्‍ह्यात काँग्रेसचा स्वतंत्र घरोबा

दुसऱ्या दिवशी अकोटचे Akot आमदार प्रकाश भारसाकळे, जि.प. चे माजी पदाधिकारी हरिभाऊ मोहोड, शिवाजी शिक्षण संस्थेचे दिनकर गायगोले यांच्यासह माजी संचालक अभिजीत ढेपे, रवींद्र गायगोले, अशोक रोडे, नितीन हिवसे आणि अनंत साबळे तसेच सुभाष बोंडे, अनंत देशमुख, गोपाल चंदन, सुनील सिसोदे, राजेंद्र देशमुख, जयश्री देशमुख, अजय मेहकरे, राजेंद्र महल्ले, सतीश गोटे, प्रिती जायले, माया हिवसे, ज्योत्सना सदार आणि संतोष कोल्हे आदींनी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com