Buldhana: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या त्रासामुळे पदाचा राजीनामा; युवती शाखेच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप

सतत अपमानित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मुळे दिला राजीनामा
Buldhana: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या त्रासामुळे पदाचा राजीनामा; युवती शाखेच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप
Buldhana NewsSaam Tv

बुलडाणा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात राज्यात युवती एकत्रित आणून त्यांचा विशेष सेल तयार करण्यात आला आहे. त्यांच्या युवती एकत्रित आणण्याच्या संकल्पाला बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात घरघर लागली असल्याचे चित्र आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काझी यांच्या अपमानित वागणुकीला कंटाळून युवती जिल्हाध्यक्ष अॅड मीरा बावस्कर यांनी आपल्या युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

हे देखील पाहा -

त्यांनी आपला राजीनामा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. अॅड बावस्कर यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील युवतीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Buldhana News
चंद्र आपला मुखडा दाखवतो तसे मुख्यमंत्री आज...; सदाभाऊ खोत यांची सडकून टीका

राष्ट्रवादीमध्ये विविध आघाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या आघाड्यांच्या विविध पदांवर पक्षाच्या वतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवती शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी खामगाव येथील अॅड. मीरा बावस्कर-माहुलीकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून नियुक्ती करण्यात आली होता. मात्र, जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काझी यांच्या वागण्याला कंटाळून अॅड. मीरा बावस्कर यांनी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ते अंतीम निर्णय घेतील.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.