HSC Result: कोकणची कमाल; मुंबई विभाग शेवटून पहिला, असा आहे विभागनिहाय निकाल

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
HSC Result
HSC ResultSaam Tv

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९३.२९ टक्के आहे.

बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हे देखील पाहा -

राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 90.91% टक्के लागला आहे. इतर विभागांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत.

HSC Result
बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी, 95.35 टक्के मुली उत्तीर्ण

विभागानुसार निकालाची टक्केवारी

कोकण - 97.21%

नागपुर- 96.52%

अमरावती - 96.34 %

लातूर- 95.25%

कोल्हापूर - 95.07%

नाशिक - 95.03%

औरंगाबाद- 94.97%

पुणे- 93.61%

मुंबई- 90.91%

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com