दिव्यांगाना अंत्योदय योजनेमधून स्वतंत्र शिधापत्रिका द्या

जिल्ह्यातील शेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व दिव्यांगांना शेगाव तहसिलामार्फत अंत्योदय रेशनकार्ड देण्यात यावे.
दिव्यांगाना अंत्योदय योजनेमधून स्वतंत्र शिधापत्रिका द्या
दिव्यांगाना अंत्योदय योजनेमधून स्वतंत्र शिधापत्रिका द्यासंजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव Shegaon शहर आणि तालुक्यातील सर्व दिव्यांगांना शेगाव तहसिलामार्फत अंत्योदय रेशनकार्ड Ration card देण्यात यावे, या मागणीच्या पुर्ततेसाठी भाजपा दिव्यांग सेलच्या वतीने शेगाव तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु असून आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. Divyangana separate ration card yojana

दिव्यांगाची कोरोना Corona काळानंतर परिस्थिती बिकट झालेली असून, दिव्यांगाना आपल्या अन्नपुरवठा योजने मधून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नाही. मात्र, अद्याप पर्यंत तहसील प्रशासनाने त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुठल्याही उपाययोजना केले नसल्याचे आरोप Allegations होत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र Maharashtra शासन निर्णयान्वये दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड देण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

त्यानुसार तालुक्यातील १७ दिव्यांगांनी विहित नमुन्यात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ७ ऑक्टोबर २०२० दिवशी अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याकरीता शेगाव तहसील कार्यालयात अर्ज सादर केलेले आहेत. मात्र, ९ महिन्यानंतरही अद्याप त्यांना अंत्योदय रेशनकार्ड मिळाले नाही. परिणामी त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. Divyangana separate ration card yojana

दिव्यांगाना अंत्योदय योजनेमधून स्वतंत्र शिधापत्रिका द्या
गर्भवती महिलांना अमृत योजने अंतर्गत वाटप करण्यात आला पोषक आहार

आता दिव्यांग बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे. हा एकप्रकारे अन्याय आहे. त्यामूळे अर्ज केलेल्या दिव्यांग बांधवांना तात्काळ अंत्योदय योजनेचे रेशनकार्ड देण्यात यावे. तसेच ज्या अधिकारी- कर्मचारी वर्गामुळे एवढे दिवस विलंब झाला आहे. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याची, कारवाई करण्यात यावी. या मागणीकरिता उपोषण करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com