नाशकात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने डीजेचा दणदणाट, पोलिसांची थेट गच्चीवर जावून धडक कारवाई!

नाशिक पोलिसांची थेट गच्चीवर जावून धडक कारवाई
Nashik News In Marathi
Nashik News In Marathiअभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक: मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नाशिकमध्येही पतंगोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. शहरातील इमारतींच्या गच्ची आणि टेरेसवर बच्चेकंपनीसह सर्वच पतंग उडवण्याचा आनंद लुटतांना पाहायला मिळताय. (Latest Nashik News In Marathi)

Nashik News In Marathi
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन...

मात्र, काही अतिउत्साही तरुण आणि नागरिकांकडून टेरेसवर डीजेच्या दणदणाटात पतंग उडवण्याचे प्रकार सुरुय. तर काही जणांकडून बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर पतंग उडवण्यासाठी करण्यात येत असल्याचं समोर आलंय. (Nashik News Updates)

हे देखील पहा-

त्यामुळे नाशिक पोलिसांनी थेट इमारातींच्या गच्चीवर जाऊन धडक कारवाईला सुरुवात केलीय. सिडको परिसरात पोलिसांनी ही कारवाई केलीय. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारती आणि घरांच्या गच्चीवर पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या तसंच जोरजोरात डीजे दणदणाटात पतंग उडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जातेय. तसंच नायलॉन मांजाही जप्त करण्यात येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com