संभाजी भिडेंच्या उपचारासाठी डॉक्टरांनी पुरस्कार सोहळ्यास जाणे टाळले!

भिडेंच्या उपचाराची जबाबदारी मिरज मधील कार्डियलॉजिस्ट डॉ. रियाज मुजावर यांना भारती हॉस्पिटलकडून देण्यात आली.
संभाजी भिडेंच्या उपचारासाठी डॉक्टरांनी पुरस्कार सोहळ्यास जाणे टाळले!
Sambhaji BhideSaam TV

सांगली : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा 27 एप्रिल रोजी सांगलीत सायकलवरून जाताना पडल्याने त्यांच्या खुब्याला मार लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. भिडेंवर उपचार करण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले. त्यांच्या उपचाराची जवाबदारी देखील सर्वात तज्ज्ञ डॉक्टरांना देण्यात आली. शस्त्रक्रियेअगोदर काही तपासणी आणि ह्रदयाच्या तपासणी करणे गरजेचे होते. या उपचाराची जबाबदारी मिरज मधील कार्डियलॉजिस्ट डॉ. रियाज मुजावर यांना भारती हॉस्पिटलकडून देण्यात आली.

हे देखील पाहा :

मुजावर यांनी स्वतःच्या एका पुरस्कार सोहळ्याला जाण्याचे टाळून ही जबाबदारी पार पाडल्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावर फिरू लागल्या. डॉ. रियाज मुजावर यांना नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड, मुंबईमधील सहारा स्टार हॉटेल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत मिळणार होता.

Sambhaji Bhide
मुंब्र्यात अनधिकृत भोंगे वाजल्यास राडा; मनसेचा सज्जड इशारा

परंतु, शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा अपघात झाला व त्यांच्या ऑपरेशन पूर्व तपासणीची जबाबदारी देण्यात मिळाल्यामुळे डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. संभाजी भिडे यांच्या प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या पोस्ट्सवर डॉ.रियाज मुजावर यांनी स्पष्टीकरण देत आपण आपली जबाबदारी पार पाडल्याचे सांगत कुणीही या विषयाला धार्मिक रंग देऊ नये असे म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.