जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...

सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू
जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...
जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...Saam Tv

पंढरपूर - रत्नागिरी- नागपूर Nagpur या राष्ट्रीय महामार्ग मध्ये सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील शेतकरी डॉक्टर भारत आप्पाराव पाटील Bharat Apparao Patil यांची 26 गुंठे जमीन गेली आहे. परंतु अद्याप या शेतकऱ्याला जमीन भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. महसूल व भूसंपादन अधिकाऱ्यांच्या दिरंगाई विरोधात शेतकरी डॉक्टर भारत पाटील यांनी सांगोला Sangola तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हे देखील पहा -

डॉक्टर भारत पाटील हे बेळगाव येथे राहतात उदनवाडी तालुका सांगोला येथे त्यांची शेतजमीन आहे या जमिनीपैकी 26 गुंठे जमीन रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्ग मध्ये गेली आहे. इतर शेतकऱ्यांना भूसंपादन विभागाकडून योग्य तो मोबदला देण्यात आलेला आहे. परंतु डॉक्टर भारत पाटील यांना अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाही.

जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...
''ओवैसींचा अजेंडा धार्मिक, त्यांना दुसरे जिन्ना व्हायचयं आणि...'' - भाजप आमदाराचा दावा

महसूल विभाग व भूसंपादन विभागातील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून व भेटून ही अद्याप मोबदला मिळालेला नाही. शासकीय नियमानुसार जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी आखेर डॉक्टर भारत पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला बहुजन ब्रिगेड संघटनेने पाठिंबा दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com