Nanded: बोगस डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार
Nanded: बोगस डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
Nanded: बोगस डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल संतोष जोशी

नांदेड - बोगस डॉक्टरने तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला आहे. आदीवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील ही घटना घडली आहे. छत्तीसगड जिल्ह्यातील नेवाकुमार नारायण मंडल असं बलात्कार करणाऱ्या डॉक्टरचं नावं आहे. हा बोगस डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून शिवणी येथे दवाखाना थाटून बसल होता.

हे देखील पहा -

दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या 21 वर्षीय पिडीत तरुणीला बोगस डॉक्टरने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी या बोगस डॉक्टर ने दिली. तसेच तीचे अश्लील फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत बोगस डॉक्टरने पिडीत तरुणीवर वारंवार बलात्कार केला.

Nanded: बोगस डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस डॉक्टर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com