डॉक्टरांचं देवपण! विमानात श्वास बंद पडलेल्या चिमुकलीला दिले जीवनदान

Doctor Vaibhavi Khodke Saved The Life of a Four Month Old Baby Girl : डॉ. वैभवी यांनी उपचार सुरुच ठेवले आणि जेव्हा चिमुकली पुर्णपणे व्यवस्थित श्वास घेऊ लागली तेव्हा डॉ. वैभवी यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
doctor vaibhavi Khodke from nagpur saved the life of a four month old baby girl from chennai in flight
doctor vaibhavi Khodke from nagpur saved the life of a four month old baby girl from chennai in flightFacebook/@LMHNagpurOfficial

नागपूर : डॉक्टरांना देवाचं दुसरं रुप का म्हणतात याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालंय. जेव्हा एका विमानात चार वर्षांच्या चिमुकलीच्या हृद्याचे ठोके (Heartbeat) आणि श्वास (Breath) अचानक बंद पडला तेव्हा नागपूरच्या (Nagpur) डॉक्टर वैभवी (Dr. Vaibhavi Khodke) या अक्षरशः देवाच्या रुपात आल्या. हजारो फूटांवर उडणाऱ्या विमानात चार महिन्यांची चिमुकली मृत्यूच्या दाढेत गेली होती. पण, डॉ. वैभवी यांनी या चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले. (doctor vaibhavi Khodke from nagpur saved the life of a four month old baby girl from chennai in flight)

हे देखील पाहा -

ही घटना आहे, चेन्नईची. चेन्नई विमानतळावरून (Chennai Airport) विमानाने सिंगापूरसाठी उड्डाण केले. विमान उड्डाण केल्याच्या काही वेळानंतरच विमानाच रडारड ऐकू आली. तेव्हा फ्लाईटच्या क्रू मेंबरने विचारपूस केली असता कळलं की, एका चार महिन्यांच्या चिमुकलीच्या (Four Months Old Baby Girl) हृद्याचे ठोके बंद पडले आहेत आणि ती श्वासही घेत नाहीये. यामुळे तिच्या पालकांनी भर विमानातच टाहो फोडला. विमानाच्या क्रु मेंबर्सने याची माहिती पायलटला दिली तेव्हा पायलटने मदतीचं आवाहन केलं. मदतीचं आवाहन करणारी उद्घोषणा ऐकताच नागपूरच्या रहिवासी असलेल्या डॉ. वैभवी खोडके (Dr. Vaibhavi Khodke, Nagpur) यांनी त्याठिकाणी धाव घेतली.

चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास अचानक झाला होता, हृदयाचे ठोकेही बंद पडले होते. तिचे पालक रडून-रडून हैराण झाले होते. भर विमानात भयाण शांतता पसरली होती. त्या चार महिन्यांच्या चिमुकलीसाठी सगळे जण प्रार्थाना करत होते. अशात डॉ. वैभवी यांनी त्या चिमुकलीला मांडीवर घेतलं आणि तिला उपचार द्यायला सुरुवात केली. चिमुकलीसाठी अशा स्थितीत जे काही करता येईल ते त्यांनी केलं. विमानातले सर्व प्रवाशी हे शांतपणे पाहात होते. उपचार करता-करता पाच-सहा मिनिटे झाली तरी चिमुकली प्रतिसाद देत नव्हती. पालक चिंताग्रस्त होते तर प्रवाशीही आशेने बघत होते. सात-आठ मिनिटांनंतर अचानक चिमुकलीचं हृदय धडधडायला लागलं आणि श्वासही सुरु झाला. तिने उलटी केली. यावेळी विमानातील सर्वांना एकच जल्लोष केला. यावेळीही डॉ. वैभवी यांनी उपचार सुरुच ठेवले आणि जेव्हा चिमुकली पुर्णपणे व्यवस्थित श्वास घेऊ लागली तेव्हा डॉ. वैभवी यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

doctor vaibhavi Khodke from nagpur saved the life of a four month old baby girl from chennai in flight
३३ वर्षांनी शाळेतल्या मित्र-मैत्रिणींची झाली भेट; आयुष्याच्या उतारवयात विमानाची सफर

यानंतर विमानातील सर्व प्रवाशांनी उभे राहात टाळ्या वाजवत डॉक्टर वैभवी यांचं कौतुक केलं. डॉ. वैभवी यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू झळकले. त्यांनीही हात जोडत सर्वांचे आभार मानले. यावेळी पायलटने डॉ. वैभवी यांच्याकडून चिमुकलीच्या तब्येतीची माहिती घेतली. तेव्हा डॉ. वैभवी यांनी सांगितलं की, लहान बाळने आताच उलटी केली आहे. त्यामुळे तिला त्वरीत उपचारांची गरज आहे. सिंगापूरला पोहोचायला साडेतीन तास लागेल, अशाच चिमुकलीबाबत तडजोड नको म्हणून सर्वात जवळचं एअरपोर्ट म्हणजे चेन्नई एअरपोर्टला पुन्हा विमान नेण्याचा सल्ला डॉ. वैभवी यांनी दिला. पायलटनेही विमान त्वरीत चेन्रईकडे वळवलं. चेन्नई विमानतळावर उतरल्यावर चिमुकलीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान नागपूरच्या स्वर्गीय लता मंगेशकर रुग्णालयाने (Lata Mangeshkar Hospital, Digdoh, Nagpur) डॉ. वैभवी खोडके यांचं कौतुक केलं आहे. रुग्णालय प्रशासनानं म्हटलंयं की, "आमची एक विद्यार्थिनी डॉ. वैभवी खोडके ही डॉक्टर होणार आहे. नुकतीच एका फ्लाइटमध्ये असताना श्वास घेण्यास त्रास होत असलेले एक लहान मूल असल्याचे पायलटने सांगितले. तेव्हा डॉ. वैभवी या ताबडतोब मदतीला धावून आल्या आणि दोघीही अस्वस्थ झालेल्या पालकांशी बोलण्यापूर्वी त्यांनी सीपीआरचे उपचार सुरू केले. यात असे दिसून आले की लहान मुलाला फक्त उलट्या करणे आवश्यक होते आणि चिमुकलीचा श्वास पुन्हा आणण्यास त्या सक्षम होत्या. आम्हाला डॉ. वैभवी यांच्या कृतीचा खूप अभिमान आहे. त्यांनी अशा आश्चर्यकारक पद्धतीने प्रतिसाद दिला!" असं म्हणत रुग्णालय प्रशासनाकडून डॉ. वैभवी यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com