'कृष्णा'च्या निवडणुकीत प्रशासनाचा हलगर्जीपणा? क-हाडकर चिंतेत

'कृष्णा'च्या निवडणुकीत प्रशासनाचा हलगर्जीपणा? क-हाडकर चिंतेत
corona akola

सातारा : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात जिल्हा प्रशासनास सपशेल अपयश आल्याचे स्पष्ट चित्र आता सातारा जिल्ह्यात दिसू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बधितांचा दर हा सातत्याने 7 ते 10 टक्यांवर राहिल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. (does-coronavirus-patients-increasing-in-karad-after-krishna-sugar-factory-election-satara-news)

कराड तालुक्यात आता पुन्हा एकदा बधितांच्या माेठ्या संख्येने वाढ हाेत असल्याने क-हाडसह जिल्ह्यातील नागरिकांबराेबरच प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कृष्णा सहकारी कारखान्याची रणधुमाळी थांबल्यानंतर हा बधितांचा वाढलेला टक्का म्हणजे निवडणुकीचे पडसाद असल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे.

फक्त व्यापाऱ्यांनी दुकान बंद केल्याने करोना जातो असा अजब जावई शोध जिल्हा प्रशासनाने लावल्याने गेल्या 4 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यातच लाॅकडाउन केल्यान ठिकठिकाणी माेर्चा काढण्यात येत आहे. साता-यात माेर्चा झाला. या माेर्चात कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भाेसले यांनी कृष्णाच्या निवडणुकीचा मुद्दा मांडला.

दरम्यान कृष्णाच्या निवडणुकांच्या बाबत प्रशासनाने अगोदरच कडक निर्बंध घातले असते तर कदाचित ही बधितांची होणारी वाढ थांबली असती. त्यामुळे आता कृष्णा कारखान्याचा गुलाल कराडवासीयांच्या अंगलट येणार असा सूर उमटू लागला आहे.

corona akola
खबरदार! कास शिवकालीन मार्ग खूला करु नका; ग्रामस्थ आक्रमक

सातारा जिल्ह्यात गत 24 तासांत 10 हजार 381 नागरिकांच्या तपासणीअंती 1015 नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याची माहिती आज (गुरुवार, ता. 8) आराेग्य विभागाने दिली. दरम्यान कराड तालुक्यात बुधवारी (ता.7) 382 नागरिकांना काेविड 19 ची लागण झाल्याचा अहवाल आला हाेता. तसेच बुधवारी (ता.7) कराड तालुक्यातील 8 बाधितांचा मृत्यू झाल्याचे आराेग्य विभागाने कळविले.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com