
Viral Video : चंद्रपूर जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. बाहेर खेळत असताना एका चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. कुत्र्याने मुलीवर हल्ला करत तिच्या गालाचा लचका तोडला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Chandrapur News)
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर शहरात सर्वोदय विद्यालय परिसरात 6 वर्षाच्या आराध्या मानकर या मुलीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकलीच्या गालाला मोठी जखम झाली आहे. या हल्ल्यात तिच्या गालाला 12 टाके पडले आहेत. यामुळे कुटुंबीय आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे.
सध्या या मुलीची शाळा सुरू आहे व परीक्षांचे दिवस असताना हा तिच्या व कुटुंबासाठी अवघड प्रसंग ठरलाय. भटक्या कुत्र्यांनी बल्लारपूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत. एकट्याने शाळेत अन्यथा कुठल्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी या त्रासाबाबत नगर परिषदेला वारंवार तक्रारी केल्या. मात्र यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. या मुलीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आराध्यावर झालेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये दिसत आहे की, ती खेळता खेळता एका गल्लीत जाते. तितक्यात तिथे असलेला कुत्रा तिच्यावर हल्ला करतो. तो तिच्या गालाचा चावा घेतो. यावेळी त्या गल्लीत इतर कोणीही नसते. कुत्र्याने चावल्यानंतर आराध्या जोरजोरात ओरडू लागते. तिचा आवाज ऐकताच तिचे आई बाबा बाहेर येतात. मुलीचा गाल पाहून तिचे वडील तिला उचलून लगेच रुग्णालयाच्या दिशेने धावताना दिसत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.