
Dombivali Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. पीडित महिलांच्या तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत आहे. अशातच कल्याण पूर्वेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २७ वर्षीय तरुणाने ३० वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलचं वारंवार शारीरिक शोषण केलं आहे. (Breaking Marathi News)
याप्रकरणी कोळसेवाडी (Dombivali) पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश घुले (वय २७ वर्ष) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आकाशची ओळख तक्रारदार महिला पोलिसासोबत इन्स्टाग्रावरून झाली होती.
त्यानंतर एके दिवशी बहाणा करून तो महिला कॉन्स्टेबलच्या घरी आला. यावेळी त्याने कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केलं. शीतपेय प्यायल्यानंतर महिला पोलिस बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
जेव्हा महिलेला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. याशिवाय आरोपी तिच्यासोबत बेडवर होता. या संपूर्ण घटनेनंतर महिला पोलिसाला (Police) मोठा धक्का बसला. तू माझ्यासोबत असे का केले? असा जाब तिने आरोपीला विचारला. यावर घाबरू नको मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आरोपी आकाशने पीडित महिलेला सांगितले.
त्यानंतर आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिला कॉन्स्टेबलशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर त्याने महिला कॉन्स्टेबलसोबत खालच्या जातीचे कारण देत लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
फिर्यादीवरून २७ वर्षीय आरोपीविरुद्ध कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. लग्नाचे अमिष दाखवून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचीच फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.