Dombivali News: भाजप मंडळ अध्यक्षावर गुन्हा दाखल; शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप

शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप; भाजप मंडळ अध्यक्षावर गुन्हा दाखल
Dombivali News
Dombivali NewsSaam tv

अभिजीत देशमुख

डोंबिवली : भाजपचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पाेलिस (Manpada Police) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशीवर शारीरीक सुखासाठी धमकी दिल्याचा (Dombivili) आरोप केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Dombivali News
Nanded News: खुल्या प्रवर्गातून विजयी; तरीही जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरून केले अपात्र

डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पिडीत महिलेने नंदू जोशी यांनी तिला फ्लॅट खाली करण्यासाठी आणि शारीरीक सुखाची वारंवार मागणी केली. महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला ही एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहे. नंदू हे पीडितेच्या पतीचे मित्र असून पोटगी रक्कम देण्यासाठी नंदू हे महिलेच्या घरी जात होते. त्याच दरम्यान त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

Dombivali News
Jalna Cyber Crime: ऑनलाईन फसवणुकीतून गेलेली ५३ हजाराची रक्‍कम परत; सायबर पोलिसांच्‍या पाठपुराव्‍याने यश

बदनाम करण्याचा पोलिसांचा कट; भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप

नंदू जोशी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दरम्यान भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वर्तणुकीबाबत पोलीस वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र कारवाई झाली नाही. उलट भाजपचे डोंबिवली शहराध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांचे नाव कसं खराब आणि बदनाम होईल, असे कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी उद्या मानपाडा पोलीस (Police) ठाण्यासमोर निषेध आंदोलन करणार असल्याचे सांगितले. याबाबत भाजपने जोशी यांच्या बचावासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com