Dombivli Crime News: कुटुंब देवदर्शनासाठी गेलं; चोरट्यांनी घरात सोन्याच्या दागिन्यांवर मारला मोठा डल्ला, डोंबिवलीतील घटना

Dombivli Crime News: डोंबिवलीत एका घरात चोरट्यांनी 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
Dombivli Crime News file photos
Dombivli Crime News file photosSaam tv

अभिजीत देशमुख

Dombivli Crime News: डोंबिवलीत चोरीची मोठी घटना घडली आहे. डोंबिवलीत एका घरात चोरट्यांनी 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

डोंबिवलीच्या पश्चिम परिसरातील भाविक अपार्टमेंट मधील एका घरात तब्बल 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घरात राहणारं कुटुंब सात दिवस देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होतं. हीच संधी चोरट्यांनी साधली.

Dombivli Crime News file photos
Mumbai Crime News: पैशांचा वाद जीवावर बेतला; सासरच्यांनी केली सुनेची हत्या, परिसरात खळबळ

चोरट्यांनी टाळा तोडून घरात प्रवेश करत लाखोंचे दागिने चोरी केले. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पश्चिमेकडे भाविक अपार्टमेंटमध्ये श्रीनिवास गुरुपोली हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. 25 एप्रिल रोजी श्रीनिवास आपल्या कुटुंबासह वाराणसी उत्तर प्रदेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते.

याच दरम्यान घरात कोणी नसल्याचे संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाटामधील 39 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केले.

Dombivli Crime News file photos
Pune Fire News: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग, अग्निबंब घटनास्थळी दाखल

काल घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. श्रीनिवास यांनी याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com