Breaking News : रेल्वे प्रशासनाचा नाकर्तेपणा, भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

डोंबिवलीत रेल्वे (Railway) प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. डोंबिवली (Dombivli) पाश्चिमेतील कोपर परिसरात रेल्वेची भिंत बांधण्याचे काम सुरू होते.
Dombivli wall collapse
Dombivli wall collapse saam tv

Dombivli news : डोंबिवलीत रेल्वे (Railway) प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. डोंबिवली (Dombivli) पाश्चिमेतील कोपर परिसरात रेल्वेची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. त्याच भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dombivli wall collapse
Mumbai : मुंबईत भीषण अपघात! घाटकोपरमध्ये ओला चालकाने ८ जणांना उडवलं

डोंबिवलीच्या पश्चिमेत कोपर परिसरात रेल्वेची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीच्या पश्चिमच्या कोपर परिसरात रेल्वेची भिंत बांधण्याचे काम चालू होते. त्याच भिंतीचा काही भाग कोसळला. यामध्ये तीन कामगार जखमी झाले आहेत. तर दोन मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बंडू कुवासे (वय ५०) आणि मल्लेश चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे. तर विनायक चौधरी (वय ३५), युवराज वेडगुत्तलवार (वय ३५), मानिक पवार (वय ६२) हे तिघे व्यक्ती या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

Dombivli wall collapse
umesh kolhe death case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात 'एनआयए'ची मोठी कारवाई; फरार आरोपी अटकेत

प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालकाने सांगितले की, 'सव्वा चार वाजले होते. त्याच्या काही वेळ आधी मी चहा पिण्यासाठी थांबलो होतो. चहा पिऊन झाल्यावर जाणार होतो, तेवढ्यात मोठा आवाज आला. घटनास्थळी गेलो तर भिंत कोसळल्याचे समजले. सदर दुर्घटना झाली, त्या ठिकाणी अंदाजे सात लोक होते. त्यातील चार जणांना काढण्यात यश आलं. दोन जण गंभीर जखमी झाले होते'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com