Uday Samant News : पाणी कुठून चोरी करू? बदनामी करू नका; उद्योगमंत्र्यांच्या धाडीनंतर ग्रामस्थांचा आक्रोश

तुम्ही सकाळी या पाण्याच्या लाईनला पाणी आहे का नाही ते पहा आणि नंतर पाणी चोरीचा आरोप करा, असा आक्रोश स्थानिक ग्रामस्थांनी उद्योगमंत्री यांच्या धाडीनंतर व्यक्त केला.
Uday Samant
Uday SamantSaam TV

अभिजीत देशमुख

कल्याण : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल डोंबिवली परिसरातील तीन ठिकाणी धाडी टाकत टँकर पाणी पुरवठ्यासाठी पालिकेच्या पाईप लाईनमधून पाणी चोरी होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. 'साहेब आमच्या नळाच्या लाईनला पाणी नाही तर आम्ही पाणी चोरी कुठून करणार. तुम्ही सकाळी या पाण्याच्या लाईनला पाणी आहे का नाही ते पहा आणि नंतर पाणी चोरीचा आरोप करा, असा आक्रोश स्थानिक ग्रामस्थांनी उद्योगमंत्री यांच्या धाडीनंतर व्यक्त केला.

उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या धाडीनंतर आज महापालिकेच्या पथकाने या ठिकाणी धाव घेत जोडणी अनधिकृत आहेत का ,या ठिकाणी पाणी चोरी होतेय का ? याची तपासणी सुरू केली. या तपासणीत तिन्ही ठिकाणी कोणतेही अनधिकृत पाणी कनेक्शन नसून बोअरवेल व खदानीमधील पाणी फिल्टर करून वापरलं जातं, याबाबतचे कागदपत्र प्रभागाधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या प्रकारणावर ग्रामस्थांनी मात्र संताप व्यक्त केला.

Uday Samant
Uddhav Thackeray News: ठाकरेंना मोठा दिलासा, संपत्ती चौकशीसंदर्भातील गौरी भिडेंची याचिका HC ने फेटाळली, २५ हजार दंड

नेमकं काय घडलं?

कल्याण डोंबिवली (Kalayan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची शासनाने दखल घेतली . 27 गावांमधील संदप गाव परिसरात टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणात पालिकेच्या पाईप लाईनमधून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर काल रात्रीच्या सुमारास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली संदप गाव परिसरात तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. या ठिकाणी टॅपिंग करत पाण्याचा कारखाना तर दोन ठिकाणी टॅपिंग करत टँकर भरला जात असल्याचे उघडकीस आणले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत.

मंत्र्यांच्या धाडीनंतर खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाचे पथक आज संदप गावात दाखल झाले . त्यांनी मिनरल वॉटरच्या प्लांट्स इतर दोन ठिकाणी देखील तपासणी केली . धाड टाकलेल्या तिन्ही ठिकाणी पाहणी केली. या तिन्ही ठिकाणी बोअरवेल व खदानी मधील पाणी फिल्टर करत टँकर पाणी पुरवठ्यसाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी मात्र मंत्र्यांच्या धाडसत्रावर नाराजी व्यक्त केली.

याबाबत पालिका अधिकारी किरण वाघमारे यांनी या तिन्ही ठिकाणी बोअर वेल व खदानी मधील पाणी फिल्टर करून वापरलं जाते. याबाबतचे कागदपत्र प्रभागाधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार आहे. अनधिकृत पाणी कनेक्शन घेऊन ते पाणी टँकर पुरवठा साठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आलेले नाही असे स्पष्ट केले. तर ग्रामस्थांनी मात्र आम्ही येथे स्थानिक नागरिक आहोत. कुठे ही जाणार नाही, असेही ग्रामस्थ म्हणाले.

Uday Samant
Sheetal Mhatre Case : 'सत्तेचा गैरवापर...'; पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डायरेंच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंधारेंची प्रतिक्रिया

'रात्री एक वाजता यायचं काय कारण होतं. दिवसा यायचं होतं . निष्कारण आमची बदनामी का करता, तुम्ही दिवसा इथे या आमच्या नळाच्या लाईनलाच पाणी नाही तर पाणी चोरून कुठून, अधिकाऱ्यांना पण माहिती आहे की, आमच्या बोअरवेल आहेत खदानी आहेत. तुम्ही निष्कारण कुणाचं तरी ऐकून आमची बदनामी करू नका. तुम्ही इथे सकाळी दहा वाजता या इकडच्या पाण्याच्या लाईनला पाणी आहे का नाही ते बघा नंतर पाणी चोरीचे आरोप करा, असा त्रागा व्यक्त केला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com