घरगुती वाद विकोपाला; १६ वर्षीय मुलीसह महिलेने संपवली जीवनयात्रा

घरगुती वाद किती टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्यय यवतमाळमधील उमरखेड तालुक्यात आला आहे.
घरगुती वाद विकोपाला; १६ वर्षीय मुलीसह महिलेने संपवली जीवनयात्रा
Yavatmal Newsयवतमाळ

संजय राठोड -

यवतमाळ : आजकाल घरगुती वाद झाला की टोकाचं पाऊल उचलण्याच्या बातम्या अनेक वेळा आपण वाचत असतो. पत्नी पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन वाद होत असतात. मात्र, हा वाद किती टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्यय यवतमाळमधील (Yavatmal) उमरखेड तालुक्यात आला आहे. पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून पत्नीने आपल्या १६ वर्षीय मुलीसोबत नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नंदा किशोर वानखेडे आणि साक्षी वानखेडे राहणार भवानी तालुका उमरखेड अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. उमरखेड तालुक्यातील (Umarkhed Taluka) भवानी या गावी किशोर वानखेडे हा पत्नी नंदासह मुलगी आणि दोन मुलांसोबत राहतो. गेल्या काही दिवसापासून पती किशोर आणि पत्नी नंदा यांच्यामध्ये काही घरगुती कारणावरून वाद सुरू होते.

Yavatmal News
कर्तव्य बजावून घरी परतताना महिला पोलिसावर काळाचा घाला; अपघातात जागीच मृत्यू

अशातच या दोघा पती-पत्नीत पुन्हा वाद झाला असता राग सहन न झाल्याने नंदा हिने आपल्या १६ वर्षीय मुलगी साक्षीला सोबत घेऊन रात्रीच्या सुमारास भवानीपासून जवळ असलेल्या नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना उमरखेड तालुक्यातील भवानी परिसरात उघडकीस आली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com