वैद्यनाथ साखर कारखान्यात राजकारण करून अडथळा आणू नका - पंकजा मुंडे

असं भाजप नेत्या तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा २१ वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.
वैद्यनाथ साखर कारखान्यात राजकारण करून अडथळा आणू नका - पंकजा मुंडे
वैद्यनाथ साखर कारखान्यात राजकारण करून अडथळा आणू नका - पंकजा मुंडेSaam TV

बीड : यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पाडा. राजकारण करून अडथळा आणू नका. वैद्यनाथ साखर कारखाना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आत्मा आहे, त्यांची नांव याच्याशी जोडले गेले आहे. हा कारखाना सर्वांचाच आहे, शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून आर्थिक अडचणींचा सामना करत मी हा कारखाना सुरू करतेयं. तथापि, यात कुणीही राजकारण करता कामा नये. अडचण निर्माण होणार नाही असेच सर्वांनी वागावे. असं भाजप नेत्या तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा २१ वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, वैद्यनाथ साखर कारखाना हा सभासद, शेतकरी आणि कर्मचारी असा सर्वांचाच आहे. गेल्या कांही वर्षांपासून साखरेचे दर कोसळल्याने व दुष्काळामुळे कारखाना आर्थिक संकटाला सामोरा जात आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, त्यांचे मनोबल खचू नये आणि कारखाना सुरू व्हावा यासाठी 'आऊट ऑफ वे' जाऊन मी प्रयत्न केले. आता सर्व अडचणींवर मात करून कारखाना सुरू करत आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या मनात ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये केवळ यासाठीच गळीत हंगाम सुरू केला असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान यामध्ये राजकारण करून अडथळा आणू नका, यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पाडा. असं देखील त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com