Ajit Pawar: "कोड्यात बोलू नका..." अजित पवारांच आशिष शेलारांना स्पष्ट बोलण्याचं आव्हान

आता अजित पवारांनी शेलारांना खूलं आव्हान केलं आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv

Ajit Pawar: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना तसं करायला सांगितलं गेलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर यावर आशिष शेलारांनी देखील भाष्य केलं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता अजित पवारांनी शेलारांना खूलं आव्हान केलं आहे. (Latest Ajit Pawar News)

प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे त्यामुळे कोड्यात बोलू नका. तुम्ही जे बोलत आहात ते लोकांना कळलं पाहिजे, असं म्हणत स्पष्ट बोलण्याचा इशारा अजित पवारांनी शेलारांना दिला आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री असताना माझ्या वेळेस ज्या ज्या चर्चा किंवा निर्णय झाले त्या त्या वेळेस त्यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चा माझ्या स्तरावर झाल्या नाहीत. ", असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. तेव्हा माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar
Beed News: नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; रखडलेल्या कामासाठी संतप्‍त तरुणाचे पाऊल

काय म्हणाले आशिष शेलार?

महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी २५० पानांचा तो रिपोर्ट मी स्वत: वाचला आहे. कोणत्या पानावर फडणवीसांच नाव आहे हे मी स्वत: पाहिलंय. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. अन्यथा फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला हे मी नवासहीत उघडं करेन, असं शेलार म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com