"...तुटेपर्यंत ताणू नका" - अजितदादांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला!

आम्हाला हेच पाहिजे असं करून जमत नाही, असं सांगताना तुटेपर्यंत ताणु नका असा सल्ला अजितदादांनी रायगडमध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
"...तुटेपर्यंत ताणू नका" - अजितदादांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला!
"...तुटेपर्यंत ताणू नका" - अजितदादांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला!Saam Tv

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: एसटी हे गरीबाच साधन आहे. त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, सरकार तयार आहे. मुख्यमंत्री मदत करीत आहेत. पण हेच आम्हाला पाहिजे असं करून जमत नाही असं सांगताना तुटेपर्यंत ताणु नका असा सल्ला अजितदादांनी (Ajit Pawar) रायगडमध्ये एसटी महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांना दिला आहे. ("... don't stretch till break" - Ajit Pawar's advice to ST employees!)

हे देखील पहा -

दिवेआगर येथे श्री सुवर्ण गणेश मुखवट्याच्या पुनर्स्थापना कार्यक्रमास आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा सल्ला दिला आहे. तर इतर राज्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना फायदे देण्यात येत आहेत त्याप्रमाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. राज्यात एसटी कर्मचारी हे गेल्या १६ दिवसांपासून संपवार गेले आहेत. शिवाय सरकारने सुमारे अडीच हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे, त्यामुळे हा संप आणखीण चिघळला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com