महाराणा प्रतापांचा पुतळा नको सैनिकी शाळा सुरु करा; खासदार जलील यांची मागणी

सैनिक शाळा मधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाईल.
Imtiyaz Jaleel
Imtiyaz JaleelSaam TV

औरंगाबाद: औरंगाबादेत महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी अशी मागणी औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे. सैनिक शाळाच महाराणा प्रताप यांचा खरा आदर व सन्मान असेल ग्रामीण भागातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण मिळेल असा जलील यांचे म्हणणे आहे. मात्र, राजपूत समाजाने याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडे खासदार जलील यांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्राव्दारे कळविले आहे.

Imtiyaz Jaleel
आगामी महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार; माजी मुख्यमंत्र्यांची माहिती

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिण्यात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार अतुल सावे व अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारण्याचे कामास सुरवात करण्याची मागणी केली होती; महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल; कारण त्यांच्या पासुन प्रेरणा घेवुन ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळामधुन देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतली.

सैनिक शाळा मधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाईल. सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय... याबाबर त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांना पत्र पाठवले आहे आणि यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. जलील यांनी या आधी ही मुंडे यांचे स्मारक बनवण्याऐवजी हॉस्पिटल बनवावे अशी मागणी केली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com