दुहेरी हत्याकांडाने वाई तालुका पुन्हा हादरला !

प्रेयसीच्या खुनाचा छडा लावताना पत्नीचा ही खून केल्याचे आरोपीने केले कबूल; वाई आणि भुईंज पोलिसांनी शिताफीने केलेल्या कारवाईत आरोपी नितीन गोळे ला ठोकल्या बेड्या.
दुहेरी हत्याकांडाने वाई तालुका पुन्हा हादरला !
दुहेरी हत्याकांडाने वाई तालुका पुन्हा हादरला!ओंकार कदम

वाई : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात काही वर्षांपूर्वी संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. तसाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. ज्या पद्धतीने पोळने खून केले होते, तशाच पद्धतीने नितीन गोळे या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्ट 2021 रोजी दुसरा खून केल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा -

3 ऑगस्ट ला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून नितीन गोळे याने संध्याचा मुतदेह शेतात पुरला होता. त्याचा भुईंज पोलिसांनी उलघडा केल्यानंतर पोलीस तपासात 2019 मध्ये नितीन गोळे याने पत्नी मनीषा गोळे हीचा देखील खून करून मृतदेह एका शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत जवळ जवळ दोन वर्षापूर्वी केलेल्या खुनाचा उलगडा केला आहे.

दुहेरी हत्याकांडाने वाई तालुका पुन्हा हादरला!
मुंबईत 'हि' संस्था देणार ३५० गणेश मंडळांना मोफत गणेशमूर्ती

पोलिसांनी शेतामध्ये पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला आहे. आतापर्यंत आरोपीने दोन खुनाची कबुली दिली आहे. परंतु आणखी काही खून या आरोपीने केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. वाई पोलीस आणि भुईंज पोलीस यांनी एकत्रितपणे या खुनाचा उलगडा केला असून त्यांच्या या कामगिरीने आणखी एका मोकाट फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.