विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा डीपीआर महिना अखेर मंजूर होईल

तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा डीपीआर अंतिम टप्प्यात आला आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा डीपीआर महिना अखेर मंजूर होईल
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा डीपीआर महिना अखेर मंजूर होईलभारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या Temple विकासासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरला महिना अखेर मंजूरी मिळणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या कडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे Nilam Gore यांनी आज पंढरपुरात Pandharpur दिली. नीलम गोऱ्हे यांनी आज मंदिर समिती पदाधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.‌ बैठकी नंतर गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.

हे देखील पहा -

तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा डीपीआर अंतिम टप्प्यात आला आहे. ऑगस्ट महिना अखेर पर्यंत डीपीआरला अंतिम मंजुरी मिळेल. त्यानंतर ती शासनाकडे मंजुरी साठी जाणार आहे. पंढरपूरच्या डीपीआर, चंद्रभागा आणि इतर विकास कामांच्यासाठी देखील मुख्यमंत्र्याकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन विधानपरिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा डीपीआर महिना अखेर मंजूर होईल
माझी डिग्री व मला विकणे आहे; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची संतप्त भावना  

डीपीआर साठी सुमारे ५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या मंदिर समिती कडे तेवढा आवश्यक निधी नाही. त्यामुळे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना या बाबत बोलून मदत करण्याची विनंती करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. पंढरपुरातील चंद्रभागानदी स्वच्छतेसह नाम संकीर्तन सभागृह साठी १० कोटी रुपयांचा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ही प्रयत्न सुरू आहेत. शेगाव धर्तीवर सुशोभित असे उद्यान सुद्धा पंढरपुरात तयार करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com