डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १ रुपयात १ लिटर पेट्राेल उपक्रमास प्रारंभ

आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरी केली जात आहे.
Petrol
Petrol Saam Tv

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (dr babashaeb ambedkar) १३१ व्या जयंती निमित्त सोलापुरात (solapur) आज दिवसभर एका रुपयात एक लीटर पेट्रोल (petrol) मिळतं आहे. इकीकडे दिवसेंदिवस महागाईने सामान्य जनतेला फटका सहन करावा लागतोय तर दुसरीकडे सोलापुरातील नागरिकांना स्वस्तात पेट्रोल देण्याचा उपक्रम आंबेडकरी अनुयायींना राबविला आहे. (dr babasaheb ambedkar jayanti latest marathi news)

हा उपक्रम राहुल सर्वगोड यांच्या माध्यमातून राबविण्यात आला असून आज दिवसभर नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल असे सांगण्यात आले आहे. आज सकाळपासून जवळपास ५०० रुपये पेट्रोलचं वितरण या ठिकाणाहून केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळ पासूनच पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी दिसून आली.

Petrol
Prithviraj Patil: ऑलिंपिक स्पर्धेत देशाचे नाव उज्जवल करीन : पृथ्वीराज पाटील

महागाईने सामान्य जनतेला फटका सहन करावा लागत आहे. नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी आम्ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती (dr babasaheb ambedkar jayanti) निमित्त हा उपक्रम हाती घेतल्याचे आयाेजकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Petrol
Satara: मनसेचा हिंदुत्ववादी मुद्दा निवडणुकीत चालणार नाही : रामदास आठवले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com