पोलीस आयुक्तांच्या निर्णयावर आंबेडकरी अनुयायी नाराज; उद्या छेडणार आंदाेलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असाे असे म्हणत कार्यकर्ते पोलीसांचे पुढचे भाषण सुरु हाेण्यापुर्वीच बैठकीतून बाहेर पडले.
solapur
solapursaam tv

सोलापूर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांची गुरुवारी (ता.१४) जयंती आहे. डाॅ. आंबेडकर यांच्या जयंती (dr babasaheb ambedkar jayanti) निमित्त सोलापुरातील (solapur) विविध मंडळांनी तसेच उत्सव समितीने 'डॉल्बी' (ध्वनीक्षेपक यंत्रणा) (dolby sound system) वाजविण्यासाठी मागितलेली परवानगी पाेलिसांनी (solapur police) नाकारली आहे. (dr babasaheb ambedkar jayanti latest marathi news)

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांची आणि विविध मंडळांची आज बैठक झाली. या बैठकीत (meeting) बैजल यांनी उत्सव साजरा करताना डॉल्बी लावता येणार नाही असे स्पष्ट केले.

solapur
Amazon Easy Store च्या फ्रँचायसीला भूलला; ५ लाख गमावून बसला; दाेघांवर संशय

या निर्णयामुळे आंबेडकरी अनुयायांनी पोलीस (police) आयुक्तालयातच रोष व्यक्त करण्यास प्रारंभ केला. कार्यकर्त्यांनी हम सब एक है चा नारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असाे असे म्हणत कार्यकर्ते पोलीसांचे पुढचे भाषण सुरु हाेण्यापुर्वीच बैठकीतून बाहेर पडले. दरम्यान डॉल्बीच्या परवानगीसाठी उद्या (बुधवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल असे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

solapur
शिरवळच्या दराेड्यासह ५ घरफाेडीतील आराेपींचा शाेध सुरु : तेजस्वी सातपुते
solapur
Solapur: बार्शीतील २ सराफांसह ७ अटकेत, ६ जणांचा शाेधू सुरु : तेजस्वी सातपुते
solapur
Satara: ढोल ताशांच्या गजरात; श्रीराम नामाच्या जयघाेषात चाफळात रथोत्सव संपन्न
solapur
FIH Women's Junior World Cup: इंडिया हरली; जर्मनी विरुद्ध नेदरलँड अंतिम लढत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com