डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विक्रम भावेला तात्पुरता जामीन

मुंबई हायकोर्टाने घातलेल्या अटींप्रमाणे भावेला पुण्यातील विशेष एनआयए कोर्टाच्या हद्दीतच रहावे लागणार आहे.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विक्रम भावेला तात्पुरता जामीन
डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विक्रम भावेला तात्पुरता जामीन saam tv

मुंबई : डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात (Dr. Narendra Dabholkar murder case) दोन वर्षांनंतर जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेला आरोपी विक्रम भावे (Vikram Bhave) याला मुंबई हायकोर्टाकडून जामिनाविषयीच्या अटीतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. (Vikram Bhave, accused in Narendra Dabholkar murder case, has been granted temporary bail)

डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विक्रम भावेला तात्पुरता जामीन
नांदेड : पेट्रोलपंप व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीची पोलिस कोठडी वाढली

आरोपी विक्रम भावे याच्याॉ वडिलांचे २५ जूनला निधन झाल्याने विविध विधी व वडिलांशी संबंधित बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी तीन आठवड्यांपुरते रत्नागिरीत राहण्याची मुभा देण्यात आली आहे . ६ मे रोजी जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाने घातलेल्या अटींप्रमाणे भावेला पुण्यातील विशेष एनआयए कोर्टाच्या हद्दीतच रहावे लागणार आहे.

तसेच, रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी निघण्यापूर्वी आणि १० ऑगस्ट रोजी परतल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावून तपशील देण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरीमधील देवरूख पोलिस ठाण्यातही दर रविवारी हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने भावेला दिले आहेत.

कोण आहे हा विक्रम भावे

हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून विक्रम भावे हा काम करत होता. ४ जून २००८ रोजी ठाण्यातील पनवेलमधील थिएटर आणि गडकरी रंगायतन याठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रमला १० वर्षांची शिक्षा झाली होती. मधल्या काळात त्याची जामिनावर बाहेर होता. डॉ. नरेंद्र दाभोळकरांना ज्या ठिकाणी गोळी मारली जाणार होती त्या ठिकाणची भावेने पुर्वतपासणी केली होती. दाभोळकरांच्या खुनासाठी वापरलेलं पिस्तूल नष्ट करण्यासाठी भावेने मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com