
- संजय राठाेड
Yavatmal News: यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरची दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात (yavatmal city police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार डॉ. रजत कावळे (Dr. Rajat Kavle) हे शहरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यवतमाळातील जीवन लडी या वकिलांनी (Yavatmal’s lawyer, Jeevan Ladhi S) त्यांना एम. ग्लोबल आणि टी. पी. ग्लोबल कंपनीची माहिती दिली. यामध्ये पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट पैसे होणार असल्याचे डॉक्टरांना सांगण्यात आले.
खरी माहिती समजल्यावर डाॅक्टरांना बसला धक्का
त्यानंतर डॉ.रजत कावळे यांनी बँकेतून कर्ज घेऊन ३ लाख ९० हजार रुपये कंपनीत गुंतवले. 6 डिसेंबर 2021 रोजी 95 हजार, 7 डिसेंबर 2021 रोजी एक लाख, 8 डिसेंबर 2021 रोजी 95 हजार आणि 10 डिसेंबर 2021 रोजी एक लाख रुपये हस्तांतरित केले. परंतु काही दिवसांतच डॉक्टरांना ही कंपनी बनावट असल्याची बातमी मिळाली. ज्याबाबत डॉक्टरांना जीवन यांना सांगितले.
एसएम ग्लोबल व टीपी ग्लोबलवर गुन्हा दाखल
त्यानंतर त्यांनी दुसऱ्या कंपनीत पैसे गुंतविले यामध्ये त्यांची जवळपास 12 लाखाची फसवणूक झाली. त्यापैकी काही रक्कम त्यांना परत मिळाली. त्यांनी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर आपली फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसात धाव घेतली. पाेलिसांनी एसएम ग्लोबल व टीपी ग्लोबलच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.