डॉ.सचिन बालकुंदे यांचा जानाई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयात वेगवेगळे उपक्रम राबवून, अनेक अत्यवस्थ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचवण्याचे काम केल्यामुळे लातूर येथील जानाई प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बालकुंदे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ.सचिन बालकुंदे यांचा जानाई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार
डॉ.सचिन बालकुंदे यांचा जानाई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कारदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी ग्रामीण रुग्णालयाचा कोरोना काळातील मृत्युदर हा एक टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होता. या काळात लागणारे साहित्य सामग्री याचा अभाव असताना सुद्धा 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉ. बालकुंदे सक्षमपणे काम करत होते. Dr. Sachin Balakunde felicitated by Janai Pratishthan

हे देखील पहा -

अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी रुग्णांना लागणारा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि रुग्णांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच अनुषंगाने आज लातूर मधील श्री जानाई प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ.सचिन बालकुंदे यांना डॉक्टर जानाई श्री पुरस्कार 2021 देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कारामध्ये डॉक्टर सचिन बालकुंदे आणि पत्नी या दोघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि रोख पंचवीस हजार रुपये रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ.सचिन बालकुंदे यांचा जानाई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार
फिर्यादीच निघाला चोर ! सांगलीच्या शेडगेवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

डॉ. बालकुंदे यांनी गेल्या जवळपास वर्षापासून कोरोनाला रोखण्यासाठी किल्लारी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत सक्षमपणे कामी केले. कोणत्याही अपुर्‍या सुविधांचा अभाव लक्षात न घेता सुद्धा कोरोना काळामध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार त्यांच्यामाध्यमातून देण्यात आले.

याच कार्याची दखल घेत श्री जानाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील डॉक्टरांना या सत्काराच्या माध्यमातून ऊर्जा मिळेल आणि पुढील काळामध्ये आणखीन लढण्यासाठी बळ मिळेल अशी प्रतिक्रिया डॉ.सचिन बालकुंदे यांनी यावेळी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com