बहिणीकडे भेटायला गेलेल्या महिलेवर अत्याचार

बहिणीकडे भेटायला गेलेल्या महिलेवर अत्याचार
Crime NewsSaam tv

अहमदनगर ः संगमनेर तालुक्यातील महिलेवर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. तशातच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. तालुक्यातील एका महिलेच्या असहायतेचा नाशिकमधील तरूणाने गैरफायदा घेतला.

बहिणीकडे गेलेल्या त्या महिलेसोबत त्याने गोडीगुलाबीने ओळख वाढवली. त्यानंतर संपर्कात येत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने मारहाणही केली. आणि गळ्यातील सोन्याची साखळीही चोरून नेली. संबंधित महिला २९ वर्षांची आहे. अत्याचार व सोनसाखळी काढून घेतल्याच्या आरोपावरुन श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील (रा. सिन्नर, जि. नाशिक) याला अटक केली आहे.Driver arrested for beating woman at Sangamner

Crime News
पाथर्डीत राजकीय घरफोडी, भाजप आमदाराचे दीर राष्ट्रवादीत

काही दिवसांपूर्वी ही महिला बहिणीला भेटण्यासाठी घोटी ( ता. इगतपुरी ) येथे गेली होती. काळ्या-पिवळ्या भाडोत्री वाहनातून घराकडे परतत असताना चालक श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील ( रा. सिन्नर) याच्याशी तिची ओळख झाली. त्याने गोड बालून तिच्याशी जवळीक निर्माण केली. तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने तिच्याशी वारंवार संपर्क केला. तिच्या खासगी गोष्टी जाणून घेतल्या. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलमधील डाटा घेतला.

या डाटाच्या आधारे तिचे फोटो बहीण व मेहुण्यांना दाखवण्याची व व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्या इच्छेविरुध्द वारंवार बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले. लोखंडी गजाने मारहाण करून तिच्या वाहनाची तोडफोड केली. तिच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी काढून घेतली.

या प्रकरणी पीडीत महिलेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील याच्याविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला मंगळवारी ( ता. 21 ) रोजी सिन्नर येथून ताब्यात घेत अटक केली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप पुढील तपास करीत आहेत.Driver arrested for beating woman at Sangamner

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com