
या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी : गुजरात राज्यातून धुळे नागपूरकडे जाणारा टेम्पो प्लास्टिक मालने भरलेला हाेता. बर्डीपाडा फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या टोलनाकाच्या दरम्यान वनवेने वाहनांची ये जा सुरू आहे. हा टेम्पो सरळ मार्गाने जाताना रेती कपचीच्या ढिगार्यावर चढल्याने अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी होत भीषण अपघात झाला आहे असं सांगितले जात आहे.
या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. वाहनातील प्लास्टिक मालही बाहेर फेकला गेल्याने मालाचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विसरवाडी पोलीस व १०८ रुग्णवाहिकेला फोन करून तत्काळ टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्या आलं.
त्यानंतर चालकास पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं. विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.