Sangli News : 31 गावात 37 टँकर दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध : सांगली जिल्हाधिकारी

7 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.
Dr. Raja Dayanidhi, sangli
Dr. Raja Dayanidhi, sanglisaam tv

Sangli News : सांगली जिल्ह्यामध्ये 31 गावात 37 टँकर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (raja dayanidhi ias) यांनी दिली. सध्या कोणत्याही तालुक्यात चाऱ्याची कमतरता नसून 31 ऑगस्टअखेर घेतलेल्या आढाव्यात पुढील दोन महिने पुरतील इतका चारा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Dr. Raja Dayanidhi, sangli
Gokul Dudh Sangh AGM : शाैमिका महाडिकांनी रान पेटवलंय, 'गोकुळ' च्या सभेत महाडिक-पाटील गटाचा भडका उडणार?

सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी या तालुक्यात काही गावांमध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अशा 31 गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जत तालुक्यात 25 तर आटपाडी तालुक्यात 6 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिली.

Dr. Raja Dayanidhi, sangli
Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

7 हजार वनराई बंधारे बांधणार

याचबरोबर पावसाची परिस्थिती संपल्यानंतर या तालुक्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले जात आहे. 7 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.

दोन महिने पुरेल चारा

सध्या कोणत्याही तालुक्यात चाऱ्याची कमतरता नसून 31 ऑगस्टअखेर घेतलेल्या आढाव्यात पुढील दोन महिने पुरतील इतका चारा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याचेही (sangli) जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com