दारुपायी संसार उद्ध्वस्त! आईला त्रास देत असल्याने पोटच्या मुलानेच केली बापाची हत्या

Beed Crime News : "तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता", म्हणत पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाच्या अंगावर, कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे.
दारुपायी संसार उद्ध्वस्त! आईला त्रास देत असल्याने पोटच्या मुलानेच केली बापाची हत्या
drunken father was killed by his own son for harassing his mother In Beedविनोद जिरे

बीड: दारू शरीरासाठी हानिकारक असतेच पण, दारूमुळे अनेक संसारही उध्वस्त झाले आहेत. दारुच्या व्यसनापायी अनेकजण नको ते कृत्य करतात आणि याचा परिणाम दारू पिणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या परिवारालाही भोगावा लागतो. अशीच एक दुर्देवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. दारू पिऊन (Alcohol) पत्नीला त्रास देणाऱ्या एका इसमाला त्याच्याच मुलाने यमसदमी धाडलं आहे. "तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता", म्हणत पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाच्या अंगावर, कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे. ही धक्कादायक अन् खळबळजनक घटना बीडच्या (Beed) साळेगाव परिसरातील माळरानावर घडली आहे.

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी केशव हंकारे वय ५५ रा. जवळबन ता. केज असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर पवन शिवाजी हंकारे वय २६ असे आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपी पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे यांना, जवळबन येथून दुचाकीवर बसवून, साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू प्यायले. त्यानंतर आरोपी पवन याने त्याचे वडील, शिवाजी हंकारे यांना, "तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा जाब विचारला. या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मुलगा पवन याने जन्मदात्या बापाच्या हातावर, पायावर, मानेवर आणि तोंडावर कोयत्याने सपासप ९ ते १० वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी हंकारे यांचा जागीच मृत्यू झाला.

या खळबळजनक घटनेनंतर आरोपी पवन याने मयत वडीलांचा मृतदेह, शेतातील सोयाबीनच्या भुसकटात झाकून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी पवन हा स्वतःचं युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने स्वतः वडिलांचा खून करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात जन्मदात्या बापाची हत्या करणाऱ्या आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

drunken father was killed by his own son for harassing his mother In Beed
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा 'एंट्री'; 24 तासांत आढळले 5 रुग्ण

दरम्यान पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र ही परिस्थिती त्याच्यावर फक्त दारुमुळे आल्याची माहिती समोर आल्याने, या दारुपायी गाव खेड्यातील कुटुंब कसे उद्ध्वस्त होत आहेत? त्या कुटुंबातील कलह आज खुनापर्यंत जाऊन टेकला आहे. त्यामुळे अशा दारुवर सरकार आणि प्रशासनाने बंदी आणावी अशी मागणी गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com