न्यायालयासमाेर मद्यपीचे नृत्य; पाेलिस कारवाईची अपेक्षा

न्यायालयासमाेर मद्यपीचे नृत्य; पाेलिस कारवाईची अपेक्षा
osmanabad court

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा न्यायालयासमोरच osmanabad court पोलिसांच्या नाकावर टिच्चून मद्यपी व्यक्तीने अर्धनग्न होऊन डान्स केला आहे. या दरम्यान तो रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसह सर्वानाच हातवारे करत विचित्र हावभाव करत होता मात्र त्याला कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला नाही. (drunker-dance-viral-osmnabad-district-court-police-crime-news)

त्याहून गंभीर बाब म्हणजे या मद्यपीच्या बाजूनेच बंदोबस्तासाठी तैनात असणारी MH-25-C-6363 या क्रमांकाची पोलिसांचे वाहन गेले. परंतु पोलिसांनीही या मद्यपीस हटकले नाही. भर रस्त्यात दुभाजकावर उभारून साधारण अर्धा तास या व्यक्तीचा नाच सुरूच होता

त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी कर्तव्यावर असणारे पोलिसांनी असे कृत्य तातडीने थांबविणे आवश्यक असल्याची चर्चा परिसरात हाेती.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com