ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट नर्मदा नदीत जाऊन बुडाली!

स्थानिक नागरिकांच्या मदतीने JCB आणि होडीच्या साहाय्याने गाडी नर्मदा नदी बाहेर काढण्यात आली.
ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट नर्मदा नदीत जाऊन बुडाली!
ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट नर्मदा नदीत जाऊन बुडाली!दिनू गावित

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा Narmada काठावरील आदिवासी पाड्यांमधील नागरिक गुजरात Gujrat राज्यात रोजगारनिमित्त जात असतात. विशेषतः ऊसतोड मजुरीसाठी नर्मदा नदी पार करून मोठ्या प्रमाणावर जात असतात. मजुरीसाठी जात असताना त्यांना नर्मदा नदी होडीतून पार करावी लागते. सिंदुरी गमन येथील ऊसतोड मजुरांचे सामान घेण्यासाठी गेलेली मॅक्स क्रुझर चारचाकी गाडी मागे घेत असताना ब्रेक फेल झाल्याने थेट 14 फूट खोल नर्मदा नदीत कोसळली.

हे देखील पहा :

या अपघातादरम्यान गाडीत चालक विनेश वसावे हे एकटेच होते. प्रसंगावधान दाखवून चालक विनेश वसावे यांनी गाडी बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, गाडी थेट नर्मदा नदीत जाऊन पूर्णपणे बुडाली. हि गाडी चालक विनेश वसावे यांच्या स्वतःच्या मालकीची आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने JCB आणि होडीच्या साहाय्याने गाडी नर्मदा नदी बाहेर काढण्यात आली. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले आहे.

ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट नर्मदा नदीत जाऊन बुडाली!
Breaking Akola : अकोल्यात तीन दिवसांची संचारबंदी; प्रशासनाचा निर्णय

महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भाग मानला जाणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने नागरिकांना आपल्या पद्धतीने मार्गक्रमण करावे लागते. नर्मदा काठावर अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. सुदैवाने गाडीत मजूर नसल्याने मोठा अपघात टळला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com