Heat Wave News: वाढती उष्णता बनली जीवघेणी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Heat Wave News: वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच दिली जाणार आहे.
school open
school openSaam TV

सुशांत सावंत

Mumbai News : राज्यातील वाढती उष्णता हा चिंतेचा विषय बनला आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सातत्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. आता राज्याच्या शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच दिली जाणार आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातल्या शाळांचा अहवाल मागवला आहे. ज्या शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत त्यांना सुट्टी मिळणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्य सरकार हा निर्णय घेणार आहे.

school open
How To Prevent Heat Stroke : फक्त पाणीच नाही तर 'या' पदार्थांनीही टाळा येईल 'हीट स्ट्रोक', कशी घ्याल काळजी ?

याबाबत लवकरच परिपत्रक काढणार असल्याची माहितीही दीपक केसरक यांनी दिली आहे. सुट्टीत अभ्यास देऊ नये, अशा सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. 15 जूनला सगळ्या शाळा सुरू होतील. तर केवळ विदर्भातील शाळा 20 जूनला सुरू होतील, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

school open
Parents Demand Due to Heat Wave: सीबीएसईसह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या, पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

पालकांची मागणी

राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालकवर्ग चिंतेत आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर  पालकांनी सीबीएसईसह इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. 

सीबीएसईच्या शाळा या १० मे पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. मात्र शाळा १० मे पर्यंत सुरू ठेवताना त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्या, असं पालक वर्गाने पत्र देऊन मागणी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com