आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीला मारहाण; सोशल मीडियामुळे पुन्हा नवरी मिळाली नवऱ्याला

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने चिडलेल्या आईवडीलांनी मुलीला पतीच्या घरून चक्क मारहाण करत फरपटत उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीला मारहाण; सोशल मीडियामुळे पुन्हा नवरी मिळाली नवऱ्याला
Love MarriageSaam TV

अमर घटारे -

अमरावती : आज आपण विज्ञान युगात वावरत असतो तरीही मुलीने किंवा मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह (Interracial love marriage) केले म्हणून त्यांना मारहाण केल्याच्या, प्रसंगी त्यांची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना अमरावतीत घडली आहे. एका मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने चिडलेल्या आईवडीलांनी मुलीला पतीच्या घरून चक्क मारहाण करत फरपटत उचलून नेल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) अंबाडा या गावात घडली होती.

दरम्यान, मुलीने ज्या मुलाशी लग्न केले होते त्या मुलाने आपल्या पत्नीला मारहाण करून नेल्याची तक्रार मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात तीन दिवसात पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. पण सदर घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताच काल रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणले व मुलीचे पोलिसांनी इनकॅमेरा जबाब नोंदवला आहे.

Love Marriage
लग्नाआधीच प्रियंका चोप्राला बनायचं होतं आई; पण यामुळे सोडला हट्ट

मुलीने सांगितले, आपल्या घरच्या लोकांनी रागाच्या भरात मला त्यांनी मारहाण केली असेल पण मला आपल्या आई-वडिलांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाही असं तिने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. तर यावेळी मुलाचे सुद्धा पोलिसांनी जबाब घेतले आणि मोर्शी पोलिसांनी त्या मुलीला मुलाच्या स्वाधीन केलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.